You are currently viewing आनंदाची बातमी : शिक्षक भरती 15 दिवसांत सुरू होणार

आनंदाची बातमी : शिक्षक भरती 15 दिवसांत सुरू होणार

नागपुर : शिक्षक भरतीसाठी बिंदू नामवलीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, शिक्षकांच्या समायोजनाचा टप्पा सुरू आहे. येत्या १५ दिवसांत शिक्षक भरतीचे पोर्टल सुरू होईल, अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.  विधानपरिषदेत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री केसरकर बोलत होते. राज्यासह उत्तर महाराष्ट्रात अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षक निवृत्त झाले. मात्र, नव्याने शिक्षक भरतीच होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, अनेक दिवसांपासून सुरू असलेली भरती प्रक्रिया पूर्णत्वास न्यावी, अशी मागणी आमदार दराडे यांनी केली.

यावर उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले, की प्रत्येक संस्थेने बिंदू नामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिल्हा परिषद व शिक्षण विभागातील यापूर्वी समायोजित झालेले ज्येष्ठ शिक्षक समायोजनातून पूर्ववत ठिकाणी आणले जात आहेत. हा टप्पा पूर्णत्वास गेला, की १५ दिवसांत जिल्हा परिषदेमार्फत जाहिरात देऊन भरती सुरू होणार आहे. जाहिरात निघाली, की पात्र विद्यार्थ्यांना चॉईस दिला जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.

गेल्या सहा वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली राज्यातील शिक्षक भरती यंदा पूर्ण होईल असे वाटत असतानाच मागील नऊ महिन्यांपासून शिक्षक भरतीची प्रक्रिया रेंगाळली आहे. एकीकडे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे शिक्षक भरतीच्या नवनव्या तारखा देत असताना दुसरीकडे मात्र एका पदावरही नवीन भरती न झाल्यामुळे लाखो उमेदवारांमधून शालेय शिक्षण विभाग व राज्य सरकारच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. ‘गेल्या सहा वर्षांपासून राज्यातील लाखो भावी शिक्षक शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत. याबाबत शिक्षणमंत्र्यांना प्रश्न विचारला असता त्यांच्याकडून अपात्र करण्याची धमकी दिली जाते. मात्र याच शिक्षणमंत्र्यांना प्राधान्यक्रम आणि निवड प्रक्रिया यामधला फरक कळत नसेल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल, अशी टीका डीटीएडबीएड स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी केली. महिला शिक्षक उमेदवाराने भरतीबाबत प्रश्न विचारला असता त्यांना अपात्र करण्याची धमकी शिक्षणमंत्र्यांनी देणे ही लज्जास्पद बाब आहे व ही बाब महाराष्ट्राला शोभणारी नाही, असेही मगर म्हणाले. 

शिक्षक भरतीसाठी पुण्यात अन्नत्याग आंदोलन
एकाच टप्प्यात 80 टक्के शिक्षक पदभरतीची जाहिरात काढून तत्काळ पदभरती करावी यासाठी पुण्यात डीटीएडबीएड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत पदभरतीची जाहिरात येणार नाही तोपर्यंत उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्या उमेदवारांनी घेतली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात 65 हजार शिक्षकांची पदे भरली जातील, अशी घोषणा केली होती. यासोबतच फेब्रुवारी 2023 मध्ये शिक्षकांच्या पात्रतेसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षाही घेण्यात आली होती, मात्र त्यानंतर शिक्षक भरतीची ही प्रक्रिया अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल मार्च 2023 मध्ये जाहीर झाला. मात्र त्यानंतर तब्बल नऊ महिने उलटले तरी शिक्षक पदभरती शासन दरबारी अडकून पडली आहे. शिक्षणमंत्री केसरकर यांनी उच्च न्यायालयात तसेच विधिमंडळामध्ये शिक्षक भरतीसंदर्भात दोन वेळा कालबद्ध कार्यक्रम सादर केला आहे, मात्र या दोन्ही तारखा उलटून गेल्या तरी शिक्षक भरती झालेली नाही.


जिल्ह्यात २०१९ मध्ये शिल्लक राहिलेल्या २०९ गणित व विज्ञान विषयाच्या पदवीधर शिक्षक पदांसाठी राबविण्यात आलेल्या भरतीत प्रक्रियेत सिंधुदुर्गला अवघे ९ शिक्षक मिळाले आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने सिंधुदुर्ग जिल्हा मागितलेल्या ९ उमेदवारांची यादी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला कळविली आहे. त्यामुळे २०१९ च्या भरती प्रक्रियेतील अजून २०० पदे रिक्त राहणार आहे. 

जिल्ह्यात २०१९ मध्ये राबविलेल्या शिक्षक भरतीसाठी गणित व विज्ञान विषयासाठी २८७ शिक्षकांची जाहिरात निघाली होती. या भरतीत केवळ ७८ पात्र उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राधान्य दिले होते. त्यामुळे २०९ पदे रिक्त राहिली होती. २०१९ च्या या भरतीत रिक्त राहिलेल्या २०९ जागांसाठी शासनाने ३ नोव्हेंबरपर्यंत पात्र उमेदवारांकडून पवित्र पोर्टलद्वारे अर्ज मागविले होते. शासनाने ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. पात्र उमेदवारांची जिल्हानिहाय यादी जाहीर केली आहे. यामध्ये सिंधुदुर्गासाठी २०९ जागा असताना केवळ ९ उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची मागणी केली आहे. त्यानुसार शासनाने सिंधुदुर्ग शिक्षण विभागाला कळविले आहे. २०१७ च्या शिक्षक अभियोग्यता परीक्षेत उत्तीर्ण होऊन २०१९ मध्ये झालेल्या भरतीसाठी रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांना या भरतीत सहभागी करून घेतले होते.

राज्यातील रिक्त शिक्षक पदांची भरती प्रक्रिया राज्याच्या शिक्षण विभागाने राबविण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. त्यानुसार प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ झाला असून या पूर्ण भरतीतील पहिला टप्पा हा २०१९ मध्ये झालेल्या प्राथमिक शाळांच्या पदवीधर शिक्षक भरतीत रिक्त राहिलेल्या पदांची भरती प्रक्रियेचा निश्चित केला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०९ पदवीधर शिक्षक पदे रिक्त असून प्राथमिक शिक्षण विभागाने तशी माहिती राज्याला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कळविली आहे. त्यानुसार शासनाने २०१७ मध्ये शिक्षक अभियोग्याता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होवून या भरती प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. ही प्रक्रिया २०१९ प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने पवित्र पोर्टलद्वारे राबविली गेली. २०२९ मध्ये जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांच्या २८७ जागांची जाहिरात भरतीसाठी काढण्यात आली होती. प्रत्यक्ष भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याला केवळ ७८ पदवीधर शिक्षक मिळाले होते तर २०९ जागा रिक्त राहिल्या होत्या. २०१९ मधील शिक्षक पद भरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न होणे तसेच माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्याच्या कारणास्तव रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम देवून ही भरती प्रक्रिया राबविली गेली.

सरकारी काम अन् महिनाभर थांब, असे गमतीने म्हणतात. पण ही गंमत शिक्षक भरतीच्या बाबतीत खरी ठरली आहे. सरकारने यंदा जानेवारीमध्ये शिक्षक भरतीचे सूतोवाच केले होते. त्यानंतर परीक्षा घेऊन आता डिसेंबर उंबरठ्यावर आला तरी एकाही उमेदवाराला नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात भरतीचा मुद्दा सरकारला ओहोटी लावण्याची शक्यता आहे.  मुळात गेल्या वर्षी जुलैमध्ये उच्च न्यायालयाने शिक्षक भरतीची सुमोटो याचिका दाखल करून घेतल्यानंतर सरकारने हालचाली केल्या.  राज्य शासनाला भरतीचा रोडमॅप कोर्टात सादर करावा लागला. त्यानुसार गेल्या वर्षीचे दुसरे सत्र सुरू होण्यापूर्वीच भरती होणार होती. पण हा रोडमॅप पाळताच न आल्याने सरकारने दुसरा रोडमॅप जाहीर करत जून २०२३ पूर्वी भरती करू असे सांगितले. 

तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशनातही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरतीची घोषणा केली. वारंवार कोर्टाचा दट्ट्या आल्याने जानेवारीमध्ये भरतीसाठी अभियोग्या परीक्षा घोषित केली. फेब्रुवारीत दोन लाख ४० हजार उमेदवारांची परीक्षाही घेतली. पण त्यानंतर जवळपास १० महिने लोटले तरी भरतीचा पत्ता नाही. या दरम्यान अभियोग्यता धारकांनी विविध जिल्ह्यात जवळपास १५ वेळा आंदोलने केली. आताही पुण्यात शिक्षण आयुक्तालयापुढे उपोषण सुरू आहे. मुंबईतही आंदोलने केली. पण सरकारने आश्वासनाशिवाय काहीच दिलेले नाही. यादरम्यान एका महिला उमेदवाराने शिक्षण मंत्र्यांना भरतीबाबत विचारणा करताच त्यांनी तिला भरतीमध्ये अपात्र करण्याचा दम दिला. यावरून सध्या संतापाचे वातावरण असून येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा तापण्याची दाट शक्यता आहे.

 आतापर्यंत काय-काय झाले?

– जुलै २०२२ : औरंगाबाद खंडपीठात सुमोटो याचिका. राज्यशासनाने २०२२ च्या द्वितीय सत्रापूर्वी शिक्षक भरतीचा रोडमॅप कोर्टात सादर केला.
– हा रोडमॅप पाळता न आल्याने नवा रोडमॅप सादर करून जून २०२३ पूर्वी भरती करण्याचे जाहीर.
– ३१ जानेवारी २०२३ : शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता परीक्षेचे परिपत्रक काढले.
– २२ फेब्रुवारी : अभियोग्या परीक्षेला सुरुवात झाली. ही परीक्षा २ मार्चपर्यंत घेण्यात आली.
– २४ मार्च : अभियोग्यता परीक्षेचा निकाल जाहीर.
– शिक्षणमंत्र्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा रोडमॅप जाहीर करत १५ जूनपूर्वी शिक्षक देण्याचे आश्वासित केले.
– १७ एप्रिल : उच्च न्यायालयाकडून भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश.
– त्यानंतर सरकारकडून २० ऑगस्टपर्यंत भरती करण्याचे परिपत्रक जारी.
– मात्र या काळात संचमान्यता आणि बिंदूनामावलीची कारणे देत वेळ मारून नेली.
– जुलै २०२३ : अभियोग्यता धारकांनी ४० दिवस शिक्षण आयुक्त कार्यालय व मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन केले.
– यानंतर मंत्र्यांनी १५ दिवसात भरतीची घोषणा केली. पण बिंदूनामावलीचे कारण देत भरती टाळली.
– सप्टेंबर २०२३ : एका अभियोग्यता धारकाने मंत्रालयावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर उमेदवारांकडून फक्त ‘स्वप्रमाणपत्र’ भरून घेण्यात आले.
– आक्टोबर २०२३ : शिक्षणमंत्र्यांनी तीन-चार वेळा माध्यमांसमोर येऊन ३० हजार शिक्षक भरती केल्याचे विधान केले.
– नोव्हेंबर २०२३ : आजच्या तारखेपर्यंत अजून एकाही उमेदवाराला नियुक्ती मिळालेली साधी जाहिरातही आलेली नाही.


शिक्षण खात्याने आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच शिक्षक भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार असून डीएड आणि बीएड् धारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात १३,५०० शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत अनेक शिक्षकांना नियुक्तीपत्र दिले आहे. त्यानुसार विविध शाळांमध्ये शिक्षक दाखल होत आहेत, तरीही सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दरवर्षी शिक्षक भरती होत नसल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही शहरातील पाच अनुदानित डीएड महाविद्यालयांत सरकारी कोट्यातील जागा भरण्यात अडचण येत आहे. यामुळे दरवर्षी शिक्षक भरती झाल्यास डीएड महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे सांगितले जात आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२ नुसार शिक्षक भरतीसाठी उमेदवारांकडून स्व-प्रमाणपत्र नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार नोंदणी पूर्ण केलेल्या उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी येत्या शुक्रवारपर्यंत (ता.६) मुदत देण्यात आली आहे. 

शिक्षक भरतीसाठी उमेदवारांनी नव्याने स्व प्रमाणपत्र नोंदणी केली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून दिलेल्या मुदतीत नोंदणी पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच ६ ऑक्टोबरपर्यंत स्व प्रमाणपत्र पूर्ण करता येणार आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply