You are currently viewing IGNOU B Ed Admission: बी एड प्रवेश सुरु

IGNOU B Ed Admission: बी एड प्रवेश सुरु

IGNOU B ED Admission: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्लीच्या वतीने बॅचलर ऑफ एज्युकेशन (बी.एड.) जानेवारी 2024 च्या बॅच प्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे. IGNOU B Ed Admission 2024 च्या प्रवेशाविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली B Ed साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाची बॅच जानेवारी 2024 पासून सुरू होत आहे.

प्रवेशापूर्वी IGNOU B Ed साठी प्रवेश परिक्षा होत असते. परीक्षापूर्व प्रवेश परीक्षेतून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. B Ed Admission Entrance Exam ही दिनांक 07 जानेवारी 2024 रोजी देशभरात होणार आहे. या प्रवेश परीक्षेद्वारे जानेवारी 2024 चे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत.

Eligibility For B Ed Admission
बॅचलर ऑफ एज्युकेशन प्रोग्राम (बी.एड.) साठी

किमान 50% गुणासह पदवी उत्तीर्ण असावा किंवा विज्ञान / सामाजिक विज्ञान वाणिज्य मानविकीमधील पदव्युत्तर पदवी असावी. 55% गुणांसह विज्ञान आणि गणितातील स्पेशलायझेशनसह अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील बॅचलर किंवा त्याच्या समतुल्य इतर कोणत्याही पात्रता असावी

आणि

* खालील श्रेणी बी एड (ODL) चे विद्यार्थी होण्यासाठी पात्र आहेतप्राथमिक शिक्षणात प्रशिक्षित सेवारत शिक्षक.
* ज्या उमेदवारांनी समोरासमोर NCTE मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षण कार्यक्रम पूर्ण केला आहे.
* SC/ST OBC (नॉन-क्रिमीलेयर) यांना किमान पात्रतेमध्ये 5% गुणांचे आरक्षण आणि सूट दिली जाईल.

AGE Limit For B Ed Admission
विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी वयाची अट नाही

Admission Criteria & Reservation
बॅचलर ऑफ एज्युकेशन प्रोग्राम (बी.एड.)- या कार्यक्रमासाठी प्रवेश गुणवत्तेवर आधारित आहे. (नोडल किंवा रिजनल सेंटरनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाईल).

B Ed Entrance Registration
बी एडसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे. 12 डिसेंबर 2023 पासून खालील लिंकवर ऑनलाइन भरता येतील येतील. जागांच्या उपलब्धतेनुसार परीक्षा केंद्रे दिली जातील. Last date of online registration 31st December, 2023

Online Registration : Link

Official Website : Link

परिपत्रक : Link

Leave a Reply