You are currently viewing GMC Dhule : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे येथे 137 जागांसाठी भरती

GMC Dhule : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे येथे 137 जागांसाठी भरती

अधिष्ठाता, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे कार्यालयाच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (चतुर्थश्रेणी) संवर्गातील विविध पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात सन 2023

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट ड (चतुर्थश्रेणी) संवर्गातील खालीलप्रमाणे विविध पदे सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक 03/01/2024 पासून दिनांक 24/01/2024,23:59 वाजेपर्यंत, या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारास प्रत्येक पदाकरीता स्वतंत्र अर्ज करावा लागेल. उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशिल, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा पदनिहाय अभ्यासक्रम आणि अर्ज करणेसाठी मार्गदर्शक सुचना इत्यादीची सविस्तर माहिती माहितीपुस्तिकेमध्ये नमुद करण्यात आलेली आहे.

जाहिरात क्र.: श्रीभाहिशावैमवसरुधुळे/सरळसेवा/गट-ड/12943/2023

Total: 137 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रयोगशाळा परिचर 07
2 शिपाई 09
3 पहारेकरी 05
4 शवविच्छेदन परिचर 03
5  प्राणी गृह परिचर 01
6 दप्तरी 01
7 परिचर 02
8 सफाईगार 26
9 शिंपी 01
10 दंत परिचर 01
11 उदवाहन चालक 01
12 वस्तीगृह सेवक/ मेस सेवक 01
13 कक्षसेवक 31
14 रुग्णपट वाहक 02
15 न्हावी 03
16 धोबी 04
18 चौकीदार 03
19 प्रयोगशाळा परिचर 01
20 माळी 01
21 कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया 09
22 बाहयरुग्ण विभाग सेवक 05
23 सुरक्षारक्षक/पहारेकरी 03
24 प्रमुख स्वयंपाकी 04
25 सहायक स्वयंपाकी 02
26 स्वयंपाकी सेवक 05
27 क्षकिरण सेवक 03
Total 137

 

शैक्षणिक पात्रता:

  1. सफाईगार: 07वी उत्तीर्ण
  2. न्हावी: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (केस कर्तनालय)
  3. माळी: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) माळी प्रमाणपत्र
  4. प्रमुख स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 01 वर्ष अनुभव प्रमाणपत्र

वयाची अट: 24 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: श्री.भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर्वोपचार रुग्णालय, धुळे

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2024  (11:59 PM)

परीक्षा: तारीख नंतर कळविण्यात येईल

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   [Starting: 03 जानेवारी 2024]

Leave a Reply