You are currently viewing Career Success Story : सोशल मिडियाच्या काळात केली पुस्तकांशी मैत्री; सलग पाच सरकारी परीक्षा केल्या पास ‘या’ तरुणीने…

Career Success Story : सोशल मिडियाच्या काळात केली पुस्तकांशी मैत्री; सलग पाच सरकारी परीक्षा केल्या पास ‘या’ तरुणीने…

Career Success Story :  आपण बघतो की, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुण-तरुणी दिवसाचा रात्र अन् रात्रीचा दिवस करुन अभ्यास करत असतात. सरकारी नोकरी मिळवणं हा विषय प्रतिष्ठेचासमजला जातो; त्यामुळे अनेकांना या परीक्षा पास करुन आपले करिअर घडवायचे असते. या स्पर्धेत आघाडी घेतली एका बिहारमधील तरुणीने. तिने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक-दोन नाही तर सलग 5 सरकारी परीक्षा पास केल्या आहेत. टीनू सिंह असे या तरुणीचे नाव आहे. 

आईचे राहिलेले अपूर्ण स्वप्न पूर्ण केले : 

टीनू सिंह  हिच्या आईने अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, कौटुंबिक जबाबदारी, बेताची आर्थिक परिस्थिती यामुळे टीनूची आई पिंकी सिंह यांना आपले स्वप्न पूर्ण करता आले नाही. पिंकी यांनी इंग्रजी विषयात एम.ए पूर्ण केले होते. याशिवाय त्यांनी बी. एड. ची पदवीही प्राप्त केली होती. पुढे आणखी अभ्यास करुन त्यांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना अधिकारी बनता आले नाही. त्यामुळे त्या गृहिणीच राहिल्या. मात्र भविष्यात आईचे स्वप्न मुलीने पूर्ण केले आहे.

 परिक्षा पास करण्याचा टीनूने धडाकाच लावला :

टीनू सिंहने एकापाठोपाठ एक अशा 5 सरकारी परिक्षेत यश मिळवले. तिच्या या कामगिरीचा कुटुंबियांनाही अभिमान वाटतो. तिचा मित्र परिवार आणि घरा शेजारील लोक तिच्या या यशामुळे फार आनंदी आहेत. एवढे यश मिळवूनही तिने अद्याप तिचे स्वप्न पूर्ण झाले नसल्याचे म्हटले आहे. तिला आणखी अभ्यास करुन सनदी अधिकारी बनायचे होते.

 

 

या परीक्षांमद्धे मिळाले यश

टीनू सिंह  हिने एका आठवड्यात 5 परिक्षांमध्ये यश मिळवलं. 22 डिसेंबरला तिची कंप्यूटर ऑपरेटरपदी निवड झाली होती. त्यानंतर त्याच्या पुढील दिवशी म्हणजे 23 डिसेंबरला बिहारच्या एसएससी सीजीएल परिक्षेत तिला यश मिळाले. त्यानंतर सहाय्यक शाखा पदाधिकारी या सरकारी पदासाठीही तिची निवड झाली होती.

BPSC परिक्षा पास करुन रचला विक्रम : 

वरिल 3 परिक्षांशिवाय बीपीएसच्या शिक्षक भरती परिक्षेतही टीनूला 6-8 च्या कॅडरमध्ये यश मिळाले. याशिवाय बीपीएससी च्या शिक्षक भरतीमध्ये तिला 9 वी ते 10 वी आणि उच्च माध्यमिकच्या 11 वी ते 12 वी कॅडरमध्येही तिला यश मिळाले. टीनू तिच्या यशाचे सर्व श्रेय आपल्या आई -वडिलांना देते.

सोशल मीडियापासून लांब राहून पुस्तकांशी केली मैत्री : 

तरुण पिढी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. दिवसातील तासन तास ते सोशल मीडियावर फुकट घालवतात. मात्र, टीनू या सोशल मीडियापासून दूर राहिली. कोणत्याच सोशल मीडियावरती तिचे अकाऊंट देखील नाही. तिने पुस्तकांशीच मैत्री केली. पुस्तकचं आपले चांगले मित्र असतात. शिवाय मी सातत्याने अभ्यास केला त्यामुळेच मला यश मिळाले, असे टीनू नेहमी सांगते.(Career Success Story)

 

Leave a Reply